लालबागचा राजा मित्रमंडळाचे इर्शाळवाडीत मदतकार्य

लालबागचा राजा मित्रमंडळाचे इर्शाळवाडीत मदतकार्य

मुंबई, ता. २२ : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे संकटाचा डोंगर कोसळला.
इर्शाळवाडी येथे दरड दुर्घटनेनंतर ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ने तेथील नागरिकांना सावरण्यासाठी तातडीने तेथे धाव घेत मदतकार्य केले. मंडळाच्या आपत्कालीन सेवा पथकाने शुक्रवारी (ता. २१) सकाळी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांना मदतीचा हात दिला. दोन मोठे टेम्पो भरुन मदतीचे साहित्य इर्शाळवाडीत पोहोचविण्यांत आले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मंडळाने महाराष्ट्रात अनेकदा नैसर्गिक आपत्तींमध्ये स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. इर्शाळवाडीतील भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या आणि यातून वाचलेल्या ग्रामस्थांसाठीही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकत्यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्यात सहभाग घेतला. तेथे आपत्तीग्रस्त नागरिकांचे सांत्वन करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यात ब्लँकेटस्, चादर, टॉवेल, चटई, महिलांसाठीचे आवश्यक कपडे तसेच पुरूषांचे आणि लहान मुलांचे कपडे, रेनकोटस्, पावसाळ्यात उपयुक्त असे गमबूटस्, विविध फळे, सुका खाऊ, बिस्किटस्, टॉर्च बॅटरीज् आदी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भविष्यात इर्शाळवाडीसाठी जे सहकार्य लागेल त्यासाठी मंडळ पुढाकार घेईल, असे मंडळाचे मानदसचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com