जिल्हास्तरीय महोत्सवात रानभाज्यांचा आस्वाद

जिल्हास्तरीय महोत्सवात रानभाज्यांचा आस्वाद

उरण, ता. २६ (बातमीदार) : प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा कृषी विभागाच्या वतीने पहिल्यांदाच जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव मंगळवारी (ता. २५) उरणमध्ये भरवण्यात आला होता. हा महोत्सव तेरापंथ हॉल, महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल सभागृह, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह या चार ठिकाणी होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्‍ज्वला बाणखेले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले.
उरण, खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग व मुरूड या तालुक्यांतून जवळपास ७० शेतकऱ्यांनी रानभाज्या महोत्सवात सहभाग घेतला होता. उरण तालुक्यातील अंदाजे २०० शेतकरी आणि उरणच्या शहरी भागातील ग्राहक भाज्या खरेदी करण्यासाठी आले होते. काही आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाज्या बनवण्याच्या विविध पद्धतीची माहिती करून दिली. महिला गटांनी पाककृती प्रदर्शन भरवले होते. उपस्थित नागरिक, शेतकऱ्यांनी बनवलेल्या विविध रानभाज्यांचा आस्वाद घेत आनंद लुटला. या वेळी विविध महिला बचत गट व शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्‍ज्वला बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी एन. व्ही. फुलसुंदर, उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर, तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर, नायब तहसीलदार जी. बी. धुमाळ, कर्जत तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, मुरूड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, अलिबाग कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, मंडळ कृषी अधिकारी के. एल. शिगवण, कृषी अधिकारी अश्विनी जाधव, उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साळवे सहभागी झाले होते.

रानभाज्यांवर मार्गदर्शन
उरणमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी आणलेल्या कवळी, भारंगी, कुडा, दिंडा, शेवळी, फोडशी, सुरण, पिंपळ इत्यादी रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्यांचे महत्त्व, आरोग्यासाठी होणारे फायदे, औषधी गुणधर्म याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक उज्‍ज्वला बाणखेले यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com