तानसा धरण ओव्हर फ्लो...

तानसा धरण ओव्हर फ्लो...

Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २६ : तुळशी तलावापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुंबई महापालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण हे ओव्हर-फ्लो झाले आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास धरण भरून वाहण्यास सुरुवात झाल्यावर एक दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल सात दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ७७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली.
प्रशासनाकडून पाच दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी २२ जुलै रोजी धरण भरून वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. २२ जुलै रोजी ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे. त्यामुळे ते धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. या धरणातून विसर्ग होत असल्याने ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
.............
धरणातील पाणीसाठा
धरण टक्केवारी आजची
तानसा ९९.९५
बारवी ८०.७६
भातसा ६१.७२
मध्य वैतरणा ६७.९५
मोडकसागर ८७.६९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.