आरपीएफतर्फे आंध्रा एज्युकेशन सोसायटी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये

आरपीएफतर्फे आंध्रा एज्युकेशन सोसायटी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये

आरपीएफतर्फे विद्यार्थ्यांना सुरक्षेबाबत जनजागृती
वडाळा (बातमीदार) ः आरपीएफच्या वतीने वडाळा पश्चिम येथील आंध्रा एज्युकेशन सोसायटी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित रेल्वे प्रवास व महिला सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शालेय विद्यार्थी व मुलींनी चालत्या लोकल ट्रेनमधून उतरणे, दारात उभे राहून प्रवास करणे, स्टंटबाजी करणे, लोकल गाड्यांवर दगडफेक करणे, रेल्वे रूळ ओलांडणे, आरक्षित दिव्यांग किंवा महिला डब्यातून प्रवास करणे आदी प्रकार टाळावेत. तसेच रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ तसेच प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीच्या वेळी पोलिस मदतीसाठी जीआरपी १५१२ क्रमांक व पोलिस मदतीसाठी १०० क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मुली व महिलांनी रात्रीच्या वेळी रिकाम्या डब्यात एकट्याने प्रवास करू नये, अनोळखी व्यक्तीकडून खाण्यापिण्याचे पदार्थ घेऊ नयेत, प्रवासादरम्यान किंवा स्थानकावर संशयास्पद व्यक्ती किंवा गतिविधी दिसल्यास आरपीएफ व पोलिसांना कळवावे, अशी माहितीपर सूचना देऊन आरपीएफ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. या वेळी २९५ विद्यार्थ्यांसह आंध्रा एज्युकेशन सोसायटी शाळेच्या उपमुख्याध्यापिका वि. पद्माकुमारी, आरपीएफ वडाळा प्रभारी निरीक्षक आर. जी. निपसया, एसआय दीपाली सिंह आदी आरपीएफ अधिकारी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
...................
मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप
घाटकोपर (बातमीदार) : प्रोबस इन्शुरन्सकडून मुंबईतील १५०० पोलिस कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचे रेनकोटचे वाटप करण्यात आले. रेनकोट सूटचे वाटप अंधेरी येथील मुंबई पोलिसचे वरिष्ठ अधिकारी गणेश पवार आणि इतर वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मुसळधार पावसात आपले कर्तव्‍य चोख बजावणाऱ्या मुंबई पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश असल्‍याचे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रोबस इन्शुरन्स ब्रोकर्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी या उपक्रमाबद्दल प्रोबस इन्शुरन्स ब्रोकरचे आभार मानले. तसेच पोलिस वातावरणाची पर्वा न करता आपली कर्तव्ये पार पाडतो. हे विचारपूर्वक उपक्रम आम्हाला आणखी प्रोत्साहित करतात, असे या वेळी गणेश पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com