तळोज्यातील प्रदूषणाची पुण्यात चर्चा

तळोज्यातील प्रदूषणाची पुण्यात चर्चा

Published on

तळोजा, ता. २६ (बातमीदार): तळोजा परिसरात होणाऱ्या प्रदूषणामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांतील नागरिकांना त्रास होत आहे. प्रदूषण महामंडळ, पर्यावरण विभाग आणि राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने याबाबत पुणे येथील राष्‍ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार न्यायाधीशांनी या बाबतची सर्व माहिती देण्याचे आदेश सामाजिक कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे तळोजातील प्रदूषणाची पुण्यातील हरित न्यायाधीकरण खंडपीठाने दखल घेतली आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्यावेळी सोडण्यात येणाऱ्या रसायनाचा उग्र वास पहाटेपर्यंत पसरत असल्याची लेखी तक्रार तळोजामधील आदर्श सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजीव सिन्हा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. या तक्राराची प्रत पुणे येथील राष्‍ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठाकडे सादर केली होती. या तक्रारीत राज्य आणि केंद्र शासनाचा उल्लेख असल्यामुळे खंडपीठाने नोंद घेऊन न्यायाधीश विजय कुलकर्णी यांच्यासमवेत नुकतीच राजीव सिन्हा यांची ऑनलाईन सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान परिसरात होणाऱ्या प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती सादर करावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे तळोजा परिसरात होणाऱ्या प्रदूषणाची दखल राष्‍ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठाने घेतल्यामुळे प्रदूषणापासून मुक्ती मिळेल, अशी आशा नागरिकांना आहे.
----------------------------------------------
तळोजातील प्रदूषणाबाबत लोक आयुक्तांकडे तक्रार केली होती. यावेळी लोकायुक्तांनी प्रदूषणाविषयी हरित न्यायाधीकरण खंडपीठाकडे लेखी तक्रार करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार पत्रव्यवहार केला असता सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
- राजीव सिन्हा, रहिवासी, तळोजा वसाहत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.