परुळेकर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस

परुळेकर महाविद्यालयात कारगिल विजय दिवस

कासा, ता. २६ (बातमीदार) : तलासरीतील परुळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून कारगिल विजय दिवसनिमित्ताने आज (ता. २६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कारगिल युद्धात पराक्रमाने लढलेल्या शूर सैनिकांचा सन्मान करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कृतज्ञतेची भावना जागृत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात २३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

प्रा. भास्कर गोतीस यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात भारत- पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशाच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी, फाळणीची अपरिहार्यता, पंडित नेहरूंनी स्वीकारलेले अलिप्ततावादाचे धोरण, फाळणी दरम्यानच्या दंगली आणि त्याची सल तसेच कारगिल युद्ध, त्याची कारणे आणि विजयाचे संस्मरण या बाबींवर प्रकाश टाकला. तसेच आपसातील सलोखा जपत राष्ट्रीय एकतेला पूरक वातावरणनिर्मिती करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कारगिल विजय दिवसानिमित्त माहितीपट दाखवण्यात आला. प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com