टेम्पोची जेसीबीला धडकला

टेम्पोची जेसीबीला धडकला

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : कल्याण परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला एका टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. झाडाची तुटलेली फांदी बाजूला करण्याचे काम जेसीबी व काही कर्मचारी करत होते, याचदरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातात काही नागरिक थोडक्यात वाचले असून टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानासमोरील सुभाष नगर येथे बुधवारी सकाळी झाडाची भलीमोठी फांदी तुटून रस्त्यावर पडली. ही भलीमोठी फांदी जेसीबीच्या साह्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. यासाठी सुभाष नगरकडून लालचौकीकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, ही फांदी जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या साह्याने बाजूला केली जात असताना एका भरधाव टेम्पोने जेसीबीला पाठीमागून जोरधार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, हा जेसीबी दीड ते दोन फूट पुढे ढकलला गेला. जेसीबीचा मागचा पंजा टेम्पोची पुढची काच तोडून थेट टेम्पोच्या केबिनमध्ये घुसला, ज्यामध्ये हा टेम्पोचालक त्यात अडकून पडला. यावेळी कर्मचारी थोडक्यात वाचले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचालकास बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, टेम्पोचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.