महापालिकेचा ठराव राज्य सरकारकडून रद्द

महापालिकेचा ठराव राज्य सरकारकडून रद्द

Published on

भाईंदर, ता.२६ (बातमीदार) : मिरा रोड येथे बांधण्यात येत असलेले सांस्कृतिक भवन, विपश्यना केंद्र व बहुउद्देशीय केंद्राची जागा स्थलांतर करण्याचा मिरा भाईंदर महानगारपालिकेच्या महासभेने एकमताने मंजूर केला होता. मात्र आता हा ठराव राज्य सरकारने रद्द केला आहे. या निर्णयावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारकडून तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. असे असले तरी याच जागेवर बहुउद्देशीय केंद्राचे काम सुरु करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने घोडबंदर येथील सरकारी जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्याचे भूमीपुजन झाले आहे. अता त्याठिकाणी कामदेखील सुरु झाले आहे. मात्र हे केंद्र याठिकाणी न बांधता अन्य सरकारी जागेत बांधावे, असा ठराव २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या महासभेत एकमताने संमत केला होता. मात्र हा ठराव राज्य सरकारने रद्द केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्राची निर्मिती ज्या जागेवर होणार आहे, तिथे नवघर गावातील स्थानिकांच्या शेतीचा उल्लेख आहे. त्यातील काही जमीनीवर स्वातंत्रसैनिकांच्या नावाचाही उल्लेख आहे. स्थानिकांनी हे केंद्र अन्य ठिकाणी हस्तांतरीत करण्यासाठी राज्य सरकराकडे अर्ज केला आहे. याठिकाणी केंद्र बांधण्यास मंजूरी दिली, तर स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होईल असे येथील नागरिकांचे म्हणने आहे. त्यामुळे हे केंद्र शहरातील अन्य सरकारी जागेवर बांधण्यात यावे. असा ठराव महासभेने मंजूर केला होता. त्याला सर्व पक्षांची मान्यता होती. परंतु महसभेचा निर्णय प्रशासनाला मान्य नव्हता. या जागेवर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने बहुउद्देशीय केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही जागा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागाकडे हस्तांतर देखील केली आहे. त्यामुळे या जागेसंदर्भातील निर्णय महासभेने घेणे संयुक्तिक ठरणार नाही अशी भूमिका घेत महापलिका आयुक्तांनी हा ठराव रद्दबातल करण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवला होता.आता त्यावर निर्णय घेत नगरविकास विभागाने महासभेचा ठराव निलंबित केला आहे.

तीस दिवसांची मुदत
महासभेचा ठराव बेकायदा आहे. तो महापालिकेच्या तसेच व्यापक लोकहिताविरुद्ध असल्याचे मत राज्य सरकारने व्यक्त केले आहे. या निर्णयावार म्हणणे मांडण्यासाठी तीस दिवसांची मूदत देण्यात आली आहे. दरम्यान याच जागेवर बहुउद्देशीय केंद्र बांधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे. केंद्राचे प्रत्यक्ष काम सुरु देखील झाले आहे. अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.