प्रसाधन गृहातील महिलांचे चित्रीकरण करणारा गजाआड

प्रसाधन गृहातील महिलांचे चित्रीकरण करणारा गजाआड

Published on

कासा, ता. २६ (बातमीदार) : डहाणू शहरातील एका व्यावसायिक आस्थापनेतील प्रसाधनगृहात महिलांचे चित्रीकरण करणाऱ्या एकाला डहाणू पोलिसांनी जेरबंद केले. शहरातील एका व्यावसायिक आस्थापनेमध्ये आरोपी प्रसाधन गृहाच्या छतावरून बाथरूममधील महिलांचे चित्रीकरण करत होता. एक तरुणी कपडे बदलत असताना तिचे लक्ष छताकडे जाताच तेथे मोबाईल असल्याचे तिला दिसले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार उघडकीस आला. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास करत या आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याने आतापर्यंत २२ तरुणींचे चित्रीकरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून डहाणू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया गोस्वामी आणि कर्मचारी संदीप नागरे यांनी अथक परिश्रम घेत पंधरा दिवसांत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. या वेळी मॉल, कपडे दुकान वा इतर ठिकाणी चेंजिंग रूम वा बाथरूम येथे गेल्यास काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.