बँकेतील २८ लाखांच्या दागिन्यांची अदलाबदल

बँकेतील २८ लाखांच्या दागिन्यांची अदलाबदल

पेण, ता. २६ (वार्ताहर) : पेण शहरातील एका खासगी बँकेत तारण ठेवलेल्या २८ लाखांच्या दागिन्यांची अफरातफर केल्याची घटना समोर आली आहे. बॅंकेतील एका महिला कर्मचाऱ्याने लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या तीन ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने ठेवले व ग्राहकांचे खरे दागिने दुसऱ्या एका सोने तारण संस्थेत ठेवत २१ लाख १० हजार ९१७ रुपये घेतल्याचे समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पेण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी बँकेत तारण ठेवलेले २८ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याने बदलून स्वतःच्या फायद्याकरीता सदर सोन्याचे दागिने इतरत्र तारण ठेवत २१ लाख १० हजार ९१७ रुपये घेतले होते. यामध्ये आरोपी महिलेने बँकेत ४ लाख ३ हजार ७६६ भरणा केला. यावेळी एकूण १७ लाख ७ हजार १५१ रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घाडगे करत आहेत. याबाबत संबंधित बँक मॅनेजर यांस या घटनेविषयी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com