उड्डाणपुलाच्या कामासाठी परिवहन बस वाहतुकीत बदल

उड्डाणपुलाच्या कामासाठी परिवहन बस वाहतुकीत बदल

Published on

ठाणे, ता. २६ (वार्ताहर) : ठाणे पूर्व येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे पूर्व भागातून ठाणे परिवहनच्या बोरिवली, नालासोपारा आणि रामनगर मार्गे वागळे आगर या बसचे संचालन आता ठाणे पश्चिम येथील रेल्वे स्थानकावरील सॅटिस पुलावरून होणार असल्याची माहिती परिवहन सेवेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ठाणे शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आलेला आहे. याच स्मार्ट सिटीअंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशन, कोपरी पूर्व येथील उड्डाणपुलाच्या सिद्धार्थनगर ते विराज टॉवरदरम्यान पिलरवर सेग्मेंट ठेवण्याचे काम २६ जुलै ते २४ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी सदरचा रास्ता २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवला असल्याने कोपरी पूर्व येथून होणाऱ्या बसचे संचालन आता ठाणे पश्चिम सॅटिस पुलावरून होणार आहे. ठाणे परिवहन सेवेच्या बोरिवली, नालासोपारा, रामनगर मार्गे वागळे आगार या बस चालतात; तर या सर्व मार्गांवरील बसच्या मार्गात गुरुवार (ता. २७) पासून बदल करण्यात येणार आहे. प्रवासी ठाणेकरांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे परिवहन सेवेने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.