सोमय्यांचा ‘तो’ व्हिडीओ खरा

सोमय्यांचा ‘तो’ व्हिडीओ खरा

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडीओ खरा असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनेने सोमय्या यांचा व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस सूत्रांकडून व्हिडीओ खरा असल्याची माहिती मिळत आहे. तपास पथक या व्हिडीओचे विश्लेषण करत असून, तो मॉर्फ केलेला नाही. हा व्हिडीओ आता कोणी व्हायरल केला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमय्या यांनी तात्काळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. व्हायरल व्हिडीओचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजला. ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्यांवर महिला शोषणाचे आरोप लावले होते. राज्य महिला आयोगानेही मुंबई पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाकडे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी आयोगाकडे यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर आयोगाकडून मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.