आपत्कालासाठी आराखडा प्रगतिपथावर

आपत्कालासाठी आराखडा प्रगतिपथावर

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील ‘युनिसेफ’च्या सहकार्याने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी ‘सर्वसमावेशक आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. त्यात सर्व संभाव्य आपत्ती आणि सर्व संबंधित यंत्रणांचा समावेश केला आहे. यामुळे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार होणारा हा आराखडा असणारे मुंबई हे देशातील पहिलेच महानगर ठरणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
पालिकेच्या परळ परिसरात असणाऱ्या शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात बुधवारी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भूकंप या आपत्तीच्या अनुषंगाने आयोजित या ‘टेबल टॉप एक्सरसाइज’ कार्यशाळेला पालिकेचे सहआयुक्त मिलिन सावंत, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, संयुक्त राष्ट्र संघाच्या युनिसेफचे प्रतिनिधी युसूफ कबीर आणि चिन्मयी हेमानी, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) रश्मी लोखंडे हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये पूर्वतयारी व नियोजन या बाबींची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. तसेच विविध संस्थांमध्ये समन्वय साधला जाणे, ही बाब अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी कार्यशाळांचे नियमितपणे व सुयोग्य प्रकारे आयोजन करणेदेखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
...
१२५ प्रतिनिधींची उपस्थिती
पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेला विविध संस्थांचे सुमारे १२५ प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन आराखड्याचा भाग असणाऱ्या १४ इमर्जन्सी सपोर्ट फंक्शन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समन्वयकांचीदेखील उपस्थित होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.