वासिंदकरांनी श्रमदानातून बुजविले खड्डे

वासिंदकरांनी श्रमदानातून बुजविले खड्डे

वासिंद, ता.३१ (बातमीदार) : वासिंद शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती. तसेच अनेकदा याठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत असे. त्यामुळे काही मदतगार व्यक्तींच्या सहकार्याने येथील तरुण, ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रविवारी (ता.३०) रोजी श्रमदानातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.

शहरातून जाणाऱ्या जुना आग्रा रोडवर मोठ- मोठे खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हे खड्डे बुजवण्यासाठी येथील काही राजकीय, सामाजिक पदाधिकारी व ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते. मात्र याबाबत सबंधित विभाग व लोकप्रतिनिधींकडून खड्डे बुजवण्याची पूर्तता होत नसल्याने स्वत:च खड्डे बुजविण्याचे ठरवले. अमोल गोरले व कृष्णा शेलार यांनी याबाबत समाजमाध्यमावर खड्डे बुजवण्यासाठी आवाहन केले. याला येथील तरुण व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला.

जेएसडबल्यु कंपनी व उद्योजक अनिल मानिवडे, माजी उपसरपंच सागर कंठे, भाजपा नेते संतोष काठोळे, शिवसेनेचे विभाग अध्यक्ष अविनाश शेलार, उद्योजक प्रीतम भेरे, माजी उपसरपंच राजेंद्र भेरे, उद्योजक शिवसेना नेते अनिस सय्यद, यांनी खड्डे भरण्यासाठी आरएमसी मटेरियल व मनुष्यबळ देण्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला. संजय पाटील व विकास शेलार यांनी जेसीबी मशीन व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. तर निलेश काठोळे यांनी श्रमदात्यांना जेवण तर संदीप म्हसकर यांनी स्वीट तसेच शिवसेना युवा जिल्हा अधिकारी मोहन कंठे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती.

फोटो - खड्डे भरण्यासाठी सहभागी ग्रामस्थ युवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com