सिडकोकडून अपेक्षा भंग

सिडकोकडून अपेक्षा भंग

खारघर, ता. ३१ (बातमीदार): मुंबई तसेच नवी मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, म्हणून सिडकोने गृहनिर्माण योजनांद्वारे ‘सर्वांसाठी घरे’ या अंतर्गत परवडणाऱ्या दरात तळोजा सेक्टर २१, २२, २७ मध्ये घरे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी या गृहनिर्माण प्रकल्पातील बहुतांश घरांना गळती लागल्याने सिडकोकडून असलेल्या अपेक्षांचा भंग झाला आहे.
सिडकोने परवडणाऱ्या घरांची महालॉटरी काढून अनेकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तरी इमारत बांधकामाच्या विविध त्रुटींमुळे सदनिकाधारकांमध्ये नाराजी आहे. तळोजातील बहुतांश घरांमधील किचन, बेडरूम, टेरेसला लागल्यामुळे गळतीमुळे सदनिकाधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सिडकोने फसवी योजना राबवून फसवणूक केल्याची भावना जनमानसात आहे. त्यामुळे लाखो रुपये कर्ज घेऊन खरेदी केलेल्या घरांना लागलेल्या गळतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
--------------------------------------------------
देखभालीची पाच वर्षांचीच हमी
सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्प बांधकाम करणाऱ्या एजन्सी पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीचे काम करणार आहेत. अजूनही काही नागरिकांनी घरांचा ताबा घेतलेला नाही. बंद घरात गळती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने बांधकाम करणाऱ्या एजन्सींकडे दहा वर्षे देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी सोसायटीमधील सदस्यांची आहे.
---------------------------------------
सिडकोच्या अधिकाऱ्याने मंत्र्यांकडून स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळवण्यासाठी घाईगडबडीने काम करून सर्वसामान्य नागरिकांना घरे वाटप केली आहेत. अशात घरांची झालेली अवस्था बघता आता घराचे हप्ते फेडावे की दुरुस्ती करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
- शिवाजी पवार, रहिवासी, केदार सोसायटी
----------------------------------
हक्काचे घर मिळाल्यामुळे सदनिकाधारकांमध्ये समाधान होते. मात्र, काहींच्या घरात पंखे लावलेल्या छिद्रांमधून तर काहींच्या स्वयंपाक घराला गळती लागली आहे. त्यामुळे घराचे छप्पर कधीही पडेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.
- कुलदीप पवार, मारावा सोसायटी, तळोजा
------------------------------------------
सिडकोच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे दिसून आले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवले असून लवकरच या विषयवार बैठक घेण्याचा प्रयत्न आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com