हडपलेला भुखंड ठाणे पालिकेच्या ताब्यात

हडपलेला भुखंड ठाणे पालिकेच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३१ : फुटबॉल टर्फ उभारून महसूल विभागाचा हडपलेला भूखंड अखेर ठाणे महापालिकेच्या ताब्यात आला आहे. शिवाईनगर भागातील उपवन क्षेत्रात महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार उद्यान आणि इतर विकासकामांसाठी सुमारे १० एकर इतका भूखंड आरक्षित होता. हा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला वर्ग केल्यामुळे आता त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील शिवाईनगर परिसरात महसूल खात्याचा भूखंड होता. पालिका विकास आराखड्यानुसार त्यातील आठ एकर भूखंड उद्यानासाठी, तर दोन एकर भूखंड हा इतर विकासकामांसाठी आरक्षित होता. मात्र हा भूखंड ताब्यात घेत एकाने आपली जागा असल्याचे भासवून त्या ठिकाणी फुटबॉल टर्फ, तसेच इतर व्यावसायिक काम चालू केले होते. ही बाब निदर्शनास येताच आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन, शासकीय जमिनीवर असलेले अतिक्रमण महापालिकेच्या माध्यमातून काढून टाकले. त्यानंतर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी २३ जून रोजी पत्र काढून महसूल खात्याच्या नावावर असलेली ही जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यामध्ये दिली आहे.

विकासाचा मार्ग मोकळा
ताब्यात आलेल्या भूखंडापैकी सुमारे २९२३६.३५ चौ.मी. जमीन बगीच्यासाठी, सुमारे ३६५८.८२ चौ.मी. जमीन २० मी. रस्ता रुंदीकरणासाठी, सुमारे २५६५.६१ चौ.मी. जमीन ३० मी. रुंद एचसीएमटीआर मार्गासाठी, सुमारे २०५९.२८ चौ.मी. जमीन पोखरण लेक इंडस्ट्री झोनऐवजी बगीचाकरिता आरक्षित आहे. या सर्व जमिनी ठाणे महापालिकेच्या नावे झाल्यामुळे आता या परिसराचा पालिकेच्या माध्यमातून विकास करणे सुलभ होणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com