सफाई कामगारांसाठी बोर्डाची स्‍थापना होणार

सफाई कामगारांसाठी बोर्डाची स्‍थापना होणार

घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः राज्यातील सफाई कामगारांसाठी माथाडी आणि सुरक्षा महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
युनायटेड सफाई कामगार युनियनच्यावतीने आझाद मैदानावर जेल भरो आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी युनियनचे अध्यक्ष ईश्वरसिंह झंझोटड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सफाई कामगारांसाठी बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय पातळीवर सफाई कामगार बोर्ड स्थापन करण्यात यावे, नाशिकच्या ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. तेव्‍हा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी १० ऑगस्ट रोजी मंत्रालयात सफाई कामगारांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक बोलावून सफाई कामगार यांच्यासाठी बोर्ड कसा स्थापन करता येईल, याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळात युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तानसेन नावरे, जयभीम आर्मीचे अध्यक्ष नितीन मोरे, जीवन भालेराव, दादासाहेब यादव, सफाई कामगारांचे नेते संदीप लोहारी, जगतुराम बोत, राजू प्रधान, धर्मवीर गेहलोत, किसन सारसार, अजय चांवरिया आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com