ईव्ही वापरकर्त्यांसाठी टाटाचे ईझेड चार्ज कार्ड

ईव्ही वापरकर्त्यांसाठी टाटाचे ईझेड चार्ज कार्ड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात नवी क्रांती घडवीत टाटा पॉवरने ई-झेड चार्ज कार्ड लॉन्च केले आहे. हे प्रगत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड असून त्यामुळे देशभरातील लाखो इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना सध्या घेत असलेल्या ईव्ही चार्जिंग क्षेत्रात नावीन्य अनुभवता येणार आहे.

बॉम्बे हाऊसमध्ये टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एमडी शैलेश चंद्रा यांच्या हस्ते ई-झेड चार्ज कार्ड लॉन्च करण्यात आले. हे कार्ड टॅप, चार्ज अँड गो अशी अतिशय सहजसोपी व वेगवान सुविधा प्रदान करते. या कार्डमध्ये एक बिल्ट-इन चिप आहे. ज्यामुळे चार्जिंग सेशन्स, त्यासाठीचे पेमेंट या प्रक्रिया कार्यक्षम, सुरक्षित आणि अखंडितपणे पार पडतात. या अद्ययावत कार्डच्या साह्याने रिचार्ज व्हॅल्यूनुसार वापरकर्ते केवळ कार्ड टॅप करून चार्जिंग प्रक्रिया आपोआप सुरू करू शकतात. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले, ‘वापरकर्त्यांना मिळणाऱ्या अनुभवात आम्ही सातत्याने सुधारणा करत असतो. ही सुविधा वापरायला अतिशय सोपी आहे. ॲप-बेस्ड अनुभवाऐवजी एखादे ठोस साधन वापरण्याला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांना हे अधिक सोपे होईल. ईव्ही वापरकर्त्यांना सहज उपलब्ध होतील अशा चार्जिंग सेवासुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे.’

--
ईव्ही चार्जिंगचे जाळे
टाटा पॉवरच्या देशभरात ५५० शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग सेवा-सुविधाचे जाळे आहे. या नेटवर्कमध्ये ४०,००० पेक्षा जास्त होम चार्जर्स, ४००० पेक्षा जास्त सार्वजनिक व अर्ध-सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्सचा समावेश आहे. ३५० शहरांमध्ये २५० बस-चार्जिंग पॉईंट्सचे नेटवर्क विस्तारलेले आहे. पुढील पाच वर्षांत २५००० चार्जिंग पॉईंट्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे देशात ईव्ही इकोसिस्टिमच्या वापरला बळ मिळेल.


--
भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली ईव्ही चार्जिंग कंपनी म्हणून आम्हाला अतिशय आनंद होत आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण सुविधा प्रदान करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी ईव्ही गाड्यांचा स्वीकार करावा व सर्व भारतीयांसाठी पर्यावरणपूरक, शाश्वत दळणवळणाची साधने विकसित करावी, यासाठी टाटा मोटर्ससोबत आमचा सहयोग कायम राहील.
- डॉ. प्रवीर सिन्हा, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा पॉवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com