लोन ॲपमार्फत खंडणीचे रॅकेट

लोन ॲपमार्फत खंडणीचे रॅकेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : व्ही. पी. रोड पोलिसांनी लोन ॲप घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये सहभाग घेतल्याच्या आरोपावरून रविवारी नवी दिल्लीतील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. हरिओम सत्येंद्र सिंग असे आरोपीचे नाव आहे. आरोपी कर्जदार व्यक्तीचे मॉर्फ केलेले अश्लील चित्र नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन लोकांकडून पैसे उकळत होता.
आरोपी हरिओम सिंग ऑनलाईन गेमिंगमध्ये सहभागी होत असे. ऑनलाईन खेळ खेळताना आरोपीचा सायबर घोटाळेबाजांशी संपर्क झाला. घोटाळेबाजांनी त्याला खंडणीच्या रॅकेटचा भाग होण्यासाठी अतिरिक्त पैशांची ऑफर दिली. पोलिस याप्रकरणी इतर पीडितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्ही. पी. रोड पोलिस ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या रॅकेटचा शोध घेत आहेत. याच प्रकरणाशी संबंधित एका आरोपीला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्या आरोपीने दक्षिण मुंबईतील एका व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याचा आरोप आहे. नवीन सैनी असे आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील दरियापूरचा रहिवासी आहे. सैनी हा कलाशाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. एका व्यावसायिक महिलेने १४ जुलैला तक्रार दिली. महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून खंडणीची मागणी केली होती. महिलेने मोबाईलवर डेली लोन अॅप्लिकेशन डाऊनलोड केले होते. पैशांची चणचण असल्याने अ‍ॅपवर कर्जासाठी अर्ज केला. महिलेला कर्जाची रक्कम तिच्या खात्यात जमा झाली. त्यानंतर आरोपींनी महिलेला फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली. आरोपींनी सुरुवातीला तिला मॉर्फ केलेले चित्र पाठवले आणि तिच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना पाठवण्याची धमकी दिली. सुरुवातीला घाबरून महिलेने त्यांची मागणी मान्य करून आरोपींना पैसे दिले. मात्र तरीही आरोपी व त्याच्या साथीदारांनी पुन्हा तिच्याशी संपर्क साधून तिला धमकावले. महिलेने त्यांना परत पैसे दिले. पैसे पाठवूनही त्यांनी तिच्या नातेवाईकांना काही मॉर्फ केलेले फोटो पाठवले आणि आणखी पैशांची मागणी केली. अखेर या प्रकाराला कंटाळून तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com