दक्षिण कमांडच्या सैनिकांचा ‘हठयोगा’

दक्षिण कमांडच्या सैनिकांचा ‘हठयोगा’

दक्षिण कमांडच्या सैनिकांचा ‘हठयोग’
स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ३० तासांचे विशेष प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी गेल्या आठवड्यात सुरू केलेल्या ‘योगा फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट अॅण्ड होलिस्टिक वेलनेस’ या कार्यक्रमात, दक्षिण कमांडच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ७७ जवानांनी मुंबईत रविवारी (ता. २०) ३० हून अधिक तासांचे शास्त्रीय हठयोग प्रशिक्षण पूर्ण केले.
सूर्य नमस्काराचा एक प्रकार असणारी सूर्यक्रिया, अंगमर्दन नावाचा खासकरून तंदुरुस्ती वाढवणारा यौगिक सराव, मानसिक संतुलन आणि स्वास्थ्य प्रदान करणारी नाडी शुद्धी आणि आधुनिक जीवनाच्या धकाधकीमधून तणावमुक्त करणारी ईशा क्रिया नावाची १२ मिनिटांची ध्यान प्रक्रिया यांसारखे सराव सहभागी शिकले.

देशभरात कार्यक्रम
हठयोग प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम खास ईशा फाऊंडेशन आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या भागीदारीने उपलब्ध करण्यात आला आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील २३ ठिकाणी दहा हजारहून अधिक सेवारत जवानांना आठवडाभराचे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षणाचा उद्देश
प्रशिक्षणाचा उद्देश आव्हानात्मक परिस्थितीत खूप ताण सहन करत असणाऱ्या सेवारत जवानांना सर्व स्तरांवर तंदुरुस्त बनवण्याचा आहे. ईशा फाऊंडेशनचे हठयोग शिक्षक मकरंद मोदे यांनी ही खास सत्रे आयोजित केली आहेत. लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी त्यांच्या भाषणात भारतीय सैन्यातील मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि समाजात सामान्यत: आणि विशेषतः भारतीय सैन्यामध्ये प्रचलित असलेल्या मानसिक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी योगाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो यावर भर दिला.

हठयोगाचे गहन विज्ञान राष्ट्रासाठी समर्पित वीरांना प्रदान करणे हे माझे खूप मोठे सौभाग्य होते. या पद्धती, त्यांच्या उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणखी वाढवतील आणि त्यांच्यामध्ये विलक्षण मानसिक स्पष्टता, लवचिकता आणि संतुलन आणतील.
- मकरंद मोदे, हठयोग शिक्षक

शिक्षकांचे प्रशिक्षण
कोईम्बतूर स्थित ईशा योग केंद्र दक्षिण कमांडमधील विविध युनिट्समधून निवडक प्रशिक्षकांना त्यांच्या युनिटमध्ये वारंवार योग कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रमाणित शिक्षक म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेल. मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी १९९२ मध्ये तामिळनाडूमध्ये ईशा योग केंद्राची स्थापना केल्यानंतर, सद्गुरू प्रत्येक व्यक्तीसाठी हठयोगाचे प्राचीन विज्ञान त्याच्या शुद्ध स्वरूपात प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी २१ आठवड्यांच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात हठयोग शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com