श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार

शिवमंदिरात भाविकांची मांदियाळी
माणगाव, ता.२१ (बातमीदार)ः पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमीनिमित्त सोमवारी तालुक्यातील शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने नागवेल व नाग प्रतिकृतीची पूजा करण्यात आली. ठिकठिकाणच्या शिवमंदिरात मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांसाठी तीर्थप्रसाद व अन्य सेवा उपलब्‍ध करून देत चोख व्यवस्था केली होती.

माणगाव ः
..................

रस्‍वेश्‍वर मंदिरात सामुदायिक अभिषेक
रसायनी (बातमीदार) : पाताळगंगा परिसरातील भाविकांनी सोमवारी शिवमंदिरात गर्दी केली होती. वावेघर ग्रामपंचायतीत दापिवली गावात पाताळगंगा नदी तीरावरील रस्वेश्वर मंदिरात पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. सभामंडपात देवस्थानच्या वतीने सामुदायिक अभिषेकांचे आयोजन केले होते. याशिवाय इतर धार्मिक कार्यक्रम झाले. रस्वेश्वर मंदिराबरोबरच गुळसुंदे येथील सिद्धेश्वर मंदिर, घोसाळीवाडीतील खारेश्वर मंदिरात दिवसभर गर्दी होती. फुले, हार, बेल आदी विक्रेत्यांनी मंदिराबाहेर दुकाने थाटली होती.
रसायनी ः रस्वेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्‍या होत्‍या.

...............

मुरूडच्या भोगेश्वर मंदिरात गर्दी
मुरूड, ता. २१ ः शहराच्या मध्यभागी असलेल्‍या भोगेश्वर मंदिराला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. सोमवारी पहाटे पाचपासून शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्‍या होत्‍या. पहिल्या पूजेचे मान प्रमोद भायदे व प्रकाश विरकुड या दांपत्याला मिळाल्याचे सीकेपी समाज संस्‍थेच्या अध्यक्षा नैनिता कर्णिक यांनी सांगितले. बेलपर्ण तसेच मंदिर परिसरातील पुष्करणीतील पाण्याने गाभाऱ्यातील स्वयंभू पिंडीवर अभिषेक करून मनोभावे पूजा करण्यात आली.
१९५२ मध्ये भोगेश्वर मंदिराची स्थापना चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजातर्फे करण्यात आली. मंदिर आवारात गणेशाचे व हनुमानाचे मंदिर आहे. एकदरा, डोंगरी, तेलवडे व मुरूड शहरातील हजारो शिवभक्तांनी दिवसभर गर्दी केली होती.

.................

पेणमध्ये नागपंचमी उत्साहात
पेण (बातमीदार) ः नागपंचमी व पहिल्‍या श्रावणी सोमवारनिमित्त भक्‍तांनी मंदिरात मनोभावे पूजा केली. तर काहींनी घरी नागाची प्रतिकृती आणून पूजा केली. अनेकजण नागपंचमीचा उपवास करतात तर काही लोक भाजक खाऊन दिवस साजरा करतात नागाला जानवे, आघाडा, दुर्वा, लाह्या दुधाचा नैवैद्य दाखवला जातो.

.........................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com