गणेशोत्सवासाठी कार्यशाळांमध्ये गजबज

गणेशोत्सवासाठी कार्यशाळांमध्ये गजबज

पनवेल, ता. २१ (वार्ताहर)ः पनवेल आणि परिसरातील ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीतील मूर्ती घरी नेण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे. अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक शाडूचे रंग, विविध प्रकारचे पोशाख परिधान केलेल्या मूर्ती, बालगणपतीला मागणी वाढली असून ग्राहकांच्या पसंतीच्या मूर्तीसाठी कलाकारांची दिवसरात्र कसरत सुरू आहे.
पनवेल आणि परिसरात गाव-खेड्यांत पारंपरिक गणेशमूर्ती घेण्याकडे अनेकांचा कल होता. पूर्वी कारागीर देईल ती मूर्ती घरी नेण्याची वर्षानुवर्षांची परंपरा होती, पण गेल्या दशकभरात उत्सवाचे स्वरूप बदलल्याने वैविध्यपूर्ण गणेशमूर्तींकडे भक्तांचा ओढा वाढला आहे. यात प्रामुख्याने युवा तसेच लहान मुलांचे हट्ट पुरवण्याकडे अनेकांची पसंती असते; तर दुसरीकडे भक्तांना विविध प्रकारच्या मूर्ती पाहण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होतो आहे. त्यामुळे प्रसिद्ध दगडूशेठ, लालबाग, टिटवाळ्याचा महागणपती, महाराजांच्या रूपातील गणेशमूर्तींना अधिक मागणी आहे.
------------------------------------------
मूर्तींमधील वेगळेपण जपण्याकडे कल
प्रदूषण टाळण्यासाठी मातीच्या मूर्तींसह शाडूच्या नैसर्गिक रंगाचा आग्रह केला जात आहे. विविध प्रकारचे पोषाख परिधान केलेल्या मूर्तींनाही चांगली मागणी आहे. ग्राहक इंटरनेटवरून मूर्ती निवड करून तशाच मूर्तीसाठी कलाकारांकडे आग्रह धरत आहेत. मूर्तीतील चोखंदळपणा वाढल्याने ट्रेंड बदलल्याचे मूर्तिकार सांगतात. वैविध्यपूर्ण कामासाठी अधिक वेळ खर्ची पडतो. त्यामुळे त्याचा दर वाढतो, पण त्यासाठी मोबदला देण्याची भक्तांची तयारी असल्याने कलाकारांचा हुरूप वाढला आहे.
-----------------------------------------
नव्या पिढीत वैविध्यपूर्ण मूर्तीची मागणी आहे. घरगुती असो की सार्वजनिक, मूर्तीचे वेगळेपण जपण्याकडे सर्वांचा कल आहे. परिणामी, मूर्तीत नवे ट्रेंड झपाट्याने येत आहेत.
- संजय म्हात्रे, गणेशमूर्ती विक्रेते, कळंबोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com