शिवळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप

शिवळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप

मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील शिवळे येथील शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव कृष्णा पराड यांचे हस्ते पदवी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून जनसेवा शिक्षण मंडळाचे सचिव पांडुरंग कोर उपस्थित होते. या वेळी बोलताना उप कुलसचिव कृष्णा पराड यांनी मुंबई विद्यापीठात चारशे प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना पदवी मिळविण्यासाठी आई, वडील व कुटुंबाचा पाठिंबा असतो, त्यांचा विश्वास, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा, नातेवाईक व समाजातील लोकांना मदत करा असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी ५५० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, तसेच जनसेवा वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना जनसेवा शिक्षण मंडळाचे सचिव पांडुरंग कोर, सहसचिव भास्कर हरड, संचालक मुरलीधर दळवी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गीता विशे यांनी केले. कार्यक्रमासाठी जनसेवा मंडळाचे संचालक मधुकर मोहपे, अशोक पाठारे, हरिश्चंद्र इसामे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोपान यशवंतराव यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com