समाजासाठी कार्य करणाऱ्यांची दखल

समाजासाठी कार्य करणाऱ्यांची दखल

समाजासाठी कार्य करणाऱ्यांची दखल
पिलर्स ऑफ डेमोक्रसी अवॉर्डसने सन्‍मानित
मुंबादेवी, ता. २१ (बातमीदार) : देशासह राज्यभरात समाजाप्रती कर्तव्याच्या भावनेने कार्यरत असणाऱ्या आणि लोकशाहीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणाऱ्या समाजरत्‍नांचा नुकताच यशवंतराव प्रतिष्ठान येथे पिलर्स ऑफ डेमोक्रसी अवॉर्डसने सन्‍मान करण्यात आला. हे सन्मान सोहळ्याचे द्वितीय वर्ष होते. डॉ. वैदेही तामन यांनी आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला.
एचआयव्हीबाधित रुग्णांची काळजी व उपचार यासंदर्भात वर्षानुवर्षे कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्या वतीने त्यांच्या पत्नीने सन्मान गौरव स्वीकारला. हिमालयातून आलेले कालिकानंद सरस्वती महाराज, पुणे देवाची आळंदी येथून आलेले संस्कृतचे अभ्यासक मधुसूधन शास्त्री रांजाळेकर यांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आयएएस चंद्रकांत डांगे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, आशियाना इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझमच्या नूतन सरनाईक, सामाजिक कार्यकर्त्या आणि चेंजमेकर कसंड्रा नाझरेथ, ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार दत्तात्रेय नलावडे, लेखक राजू परुळेकर, कमलेश सुतार, ज्येष्ठ छायाचित्रकार कुमार, एस. एल. गायक संगीतकार नंदेश उमप, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक करणसिंग राठौर, उद्योजिका नम्रता ठक्कर आणि डॉ. संतोष पांडे यांना लोकशाही स्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. वैदेही म्हणाल्या, की लोकशाही टिकवण्यासाठी या दिशेने काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
.....................................
वधू तस्‍करीचा मुद्दा गंभीर
करणसिंह राठौरने मेरी कोम आणि गंगूबाई यासारख्या चित्रपटांसाठी संवाद लिहिले आहेत. करणसिंग राठोड म्हणाले, की आपण सर्वांनी मानवी तस्करी आणि बाल तस्करीबद्दल ऐकले आणि वाचले आहे. परंतु वधू तस्करी हे धक्कादायक सत्य आहे. मी वधू तस्करीचा मुद्दा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि चित्रपटातून समाजात असेही घडते हे दाखवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com