मोरबे धरणाकडे पावसाची पाठ

मोरबे धरणाकडे पावसाची पाठ

वाशी, ता. २१ (बातमीदार)ः नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात जुलैमध्ये दमदार पाऊस पडल्यामुळे मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु ऑगस्टमध्ये एकीकडे पावसाने दडी मारली आहे; तर दुसरीकडे दररोज शहराला ४६० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होत असल्याने यंदाही मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरणार नसल्याची शक्यता आहे.
जूनमध्ये पावसाने हात आखडता घेतला होता, परंतु जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे. २३ जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात फक्त ३३ दिवस पाणीपुरवठा करता येईल एवढाच साठा शिल्लक होता, परंतु माथेरानच्या डोंगररांगांमध्ये काही दिवसांतच ४ हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे; तर मोरबे धरण क्षेत्रात आतापर्यंत २८५४ मिमी. पाऊस पडला असल्याने धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला होता. त्यामुळे सध्या धरणाची पातळी ८६.३५ मीटर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक जलसाठा असल्याने ८ जुलै २०२४ पर्यंत नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, एवढा जलसाठा धरणात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
----------------------------------------
मोरबे धरणात चांगला पाणीसाठा झाला असला तरी पावसाने उघडीप दिल्याने वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत पालिका योग्य ती खबरदारी घेत आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने धरण शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com