कुंभेरेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

कुंभेरेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी

पडघा, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील कुंभेरी नदीकिनारी निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या प्रसिद्ध कुंभेरेश्वर महादेव मंदिर आणि पडघा येथील ऐतिहासिक शंकर मंदिरात श्रावणातील सोमवार आणि नागपंचमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने शिवभक्तांसाठी हा दुधशर्करा योग असल्याने भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत कुंभेरेश्वर महादेव मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाचे; तर पडघा गावातील ऐतिहासिक शंकर मंदिरातील शिवलिंगासह पुरातन नागाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
….
पडघा : कुंभेरेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
…..
मुंब्रा ते खिडकाळी मंदिर पायी यात्रा
कळवा (बातमीदार) : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मुंब्रा येथील वारकरी संप्रदाय सेवा मंडळाच्या वतीने मुंब्रा-कौसा गाव ते खिडकाळीश्वर मंदिर (खिडकाळी गाव) येथे सोमवारी पायी दर्शन यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या प्रमाणात शिवभक्त सहभागी झाले होते. याप्रसंगी कल्याणफाटा नाका येथे पायी दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. मुंब्रा देवी सेवा मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल वाघमारे, शरद जमदाडे, गोपी पाटील, प्रभात देसाईकर तसेच गोपीनाथ (बुवा) चिंचोलकर आदी समाजसेवक ही श्रावण महिन्यातील पापी दर्शन यात्रा मागील बारा ते तेरा वर्षांपासून काढतात.
….
महाकालेश्वर मंदिरामध्ये गर्दी
दिवा (बातमीदार) : दिव्याच्या शिळ गावातील महाकालेश्वर मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. नागपंचमीचा दिवस असल्यामुळे भक्तांनी सकाळीच पाच वाजल्यापासून महाकालेश्वर मंदिरामध्ये रांगेमध्ये उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले. हे मंदिर १५० ते २०० वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com