ठाकूर रामनारायन कॉलेजमध्ये ‘यिन क्लब’ची स्‍थापना

ठाकूर रामनारायन कॉलेजमध्ये ‘यिन क्लब’ची स्‍थापना

ठाकूर रामनारायन कॉलेजमध्ये ‘यिन क्लब’ची स्‍थापना
मुंबई, ता. २१ ः सकाळ माध्यम समूहाचे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क म्हणजे ‘यिन’चे नेटवर्क आता संपूर्ण मुंबईमध्ये पसरत चालले आहे. दहिसर येथील ठाकूर रामनारायन कॉलेजमध्ये नुकतीच महायिन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमात यिन मुंबई शहर अध्यक्ष दामिनी उपाध्याय, मुंबई यिन महापौर वशिष्ठ ठाकर, यिन कॅबिनेट सांस्कृतिक मंत्री संजय गिरी, यिन कोर टीम हेड प्राची यादव, सोनिया गोरड, श्‍वेता राहाटे, ईश्वर पुरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यिनच्या मंत्र्यांनी या वेळी यिन व त्‍याच्‍या कार्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी सवांद साधला. या वेळी यिनचा मूळ हेतू व यिन क्लबचे कार्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर यिन क्लबच्‍या पोस्टरचे अनावरण करत यिन क्लबची स्थापना करण्यात आली. या वेळी यिन क्लब अध्यक्ष रिद्धी राठोड व उपाध्यक्ष ज्ञानाम विश्वासराव यांनी महिमा योगेश्वरार यांची यिन क्लब शिक्षक अध्यक्षपदी निवड करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी ठाकूर रामनारायण कला आणि वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ महाविद्यालय) द्वारे आयोजित मॉक संसदेत यिन क्लबच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला व समान नागरी संहिता या विषयावरील चर्चेत योगदान दिले. हा संपूर्ण कार्यक्रम एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर धनंजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय सोळंकी याने उत्तमरीत्या पार पाडले.
..................................
यिन क्लबमधील पदाधिकारी
सोशल मीडिया अध्यक्ष- प्रणय पाले, सोशल मीडिया उपाध्यक्ष- सिमरन टोपीवाला, इव्हेंट मॅनेजमेंट चेअरमन- इनायत रोजानी, इव्हेंट मॅनेजमेंट उपाध्यक्ष- साहिल चाचड, क्लबचे प्रवक्ते- प्रणय सोळंकी, आयोजक- हिमांश, कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष- धीरज विश्वकर्मा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com