परुळेकर महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान

परुळेकर महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान

कासा, ता. २१ (बातमीदार) : कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि तलासरी पोलिस ठाण्याच्या वतीने संयुक्तपणे शुक्रवारी (ता. १८) ऑगस्ट २०२३ कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय, तलासरी येथे ‘माझी माती, माझा देश’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विजय मुतडक, प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, माजी सैनिक हरेश सांबर आणि संदीप डावरे, महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये देशाच्या सीमेवर ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली अशा तलासरीमधील माजी सैनिकांच्या कामाचा गौरव आणि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य, डॉ. बी. ए. राजपूत यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी भारतीय सैन्य दलातील जवानांचे देश सुरक्षेतील योगदान आणि त्याच्यासमोरील समस्येचा थोडक्यात आढावा घेतला. या वेळी पोलिस अधिकारी विजय मुतडक यांनी ‘सैन्य शिस्त आणि तिचे जीवनातील महत्त्व’ याविषयी विद्यार्थ्यांना मागर्दर्शन केले. या वेळी ते म्हणाले, की ‘विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये सैन्यातील विविध पदांवर काम करण्यासाठी अंगमेहनतीबरोबरच सातत्याने अभ्यास करत राहिले पाहिजे, ज्यामुळे सैन्य क्षेत्रातील विविध संधी प्राप्त करता येतील. सैन्यामध्ये विविध आव्हाने आणि कौशल्ये शिकण्यास मिळतात, ज्यामुळे जीवन सुरक्षित आणि समाधानी जगणे शक्य बनते.’ या वेळी माजी सैनिक हरेश सांबर आणि संदीप डावरे यांनी आपला सैन्यदलातील प्रवास आणि दिलेले योगदान तसेच सैनिक म्हणून केलेली देशसेवा व त्याग याचा थोडक्यात आपल्या मनोगतातून आढावा घेतला, तसेच पालघर जिल्ह्यातून अधिकाधिक तरुणांनी सैनिक व्हावे व देशसेवा करावी ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी एकूण विद्यार्थी १९० पेक्षा जास्त उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com