मनसेचे खड्यांत झाडे लावत आंदोलन

मनसेचे खड्यांत झाडे लावत आंदोलन

वाडा, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे वाहनचालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. २१) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाडा तालुका शाखेच्या वतीने खंडेश्वरी नाका व गांध्रे येथे खड्ड्यात बेशरमांची झाडे लावून निषेध नोंदवत आंदोलन छेडण्यात आले. मनसेचे तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, उपतालुका अध्यक्ष दिलीप सांबरे, उप तालुका अध्यक्ष नितीन भोईर, मनसे माथाडी तालुका अध्यक्ष संदीप भुजारे, मनविसे तालुका अध्यक्ष विक्रांत ठाकरे, विभागध्यक्ष भरत गावित, विकी काळे, सूरज पाटील, भूपेश सावंत, शहर अध्यक्ष मधुर म्हात्रे, विभाग अध्यक्ष स्वप्नील मोरे, शहर सचिव विजय बोरसे, उप शहराध्यक्ष वैभव किणी, मनविसे शहराध्यक्ष हेमंत जाधव, उप शहराध्यक्ष ओमकार साळुंखे, शहर उपाध्यक्ष श्याम वास्कर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त सहभागी झाले होते. दरम्यान, गणेशोत्सवाआधी रस्ता सुस्थितीत तयार करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कांतीकुमार ठाकरे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com