‘ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन’ची रेल्वेला संजीवनी

‘ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन’ची रेल्वेला संजीवनी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या रेल्वे अपघातांनंतर तात्काळ मदत पोहचून रेल्वे मार्ग सुरळित करण्यासाठी इगतपुरी येथील ‘ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन’ (एआरटी) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रेल्वे अपघातानंतर जड उपकरणांची हाताळणी, जलद दुरुस्तीसाठी एआरटीच्या इगतपुरी येथील टीमने अनेक कल्पक उपकरणे आणि तंत्रज्ञान यशस्वीरीत्या विकसित आणि तैनात केल्याने अपघात वा तांत्रिक बिघाडानंतर तात्काळ मदत मिळणे सुलभ झाले आहे.

भारतीय रेल्वेला सुरळित कामकाज करताना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणांमुळे होणारे अपघात कार्यप्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकतात, ज्यामध्ये ‘एआरटी’ची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या विशेष गाड्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री आणि उपकरणांनी सुसज्ज असतात. ही सामग्री एआरटीमधून अपघाताच्या ठिकाणी नेली जाते.

यंत्रसामग्री उतरवण्याची, वाहतूक करण्याची आणि रीलोड करण्याची प्रक्रिया श्रम-केंद्रित आणि वेळखाऊ ठरते. यामुळे अनेकदा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यास विलंब होतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी एआरटी इगतपुरी टीमने ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील भौतिक भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कल्पक उपकरणे आणि तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे आणीबाणी आणि बिघाडाच्या वेळी आवश्यक उपकरणे व्यवस्थापित करण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. यामध्ये मटेरियल हँडलिंग मिनी क्रेन, इलेक्ट्रिक क्रेन, मिनी फोर्कलिफ्ट्स, जॅक-लिफ्टिंग डिव्हाईस आणि रेल्वे कम रोड ट्रॉलीज यासारखे अनेक तंत्रज्ञानांचा समावेश असून ही यंत्रे इगतपुरी टीमने यशस्वीरीत्या विकसित केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com