सुरक्षा रक्षकाची गोळी घालून हत्या

सुरक्षा रक्षकाची गोळी घालून हत्या

कोलाड रेल्वे फाटकावरील
सुरक्षा रक्षकाची गोळी घालून हत्या
रोहा, ता. २१ (बातमीदार) ः कोकण रेल्वे मार्गावर कोलाडजवळील तिसे गावाच्या रेल्वे गेटवरील सुरक्षा रक्षकाची सोमवारी (ता. २१) भरदिवसा गोळी घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रकांत कांबळे असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चंद्रकांत कांबळे रोहा तालुक्यातील (जि. रायगड) कोलाडजवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत होते. सोमवारी कर्तव्यावर असताना दुपारी चारच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने त्यांची गोळी झाडून हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेचे वृत्त समजताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. हत्येच्या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नसला तरी परिसरात घबराट पसरली आहे.
दरम्यान, तिसे फाटक परिसरात घटना घडली त्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांना मारेकऱ्याचा शोध घेणे आव्हान ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com