सेन्सेक्सकडून पुन्हा ६५ हजारपल्ल्याड

सेन्सेक्सकडून पुन्हा ६५ हजारपल्ल्याड

मुंबई, ता. २१ : जागतिक शेअर बाजारांतील घसरणीला ब्रेक लागल्याने आज भारतीय शेअर बाजारांतही खालच्या भावात खरेदी झाली. सेन्सेक्स २६७.४३ अंशांनी वधारून ६५,२१६.०९ वर; तर निफ्टी ८३.४५ अंशांनी वाढून १९,३९३.६० वर बंद झाला. सेन्सेक्सने पुन्हा ६५ हजारांचा टप्पा सर केल्याने बाजारात पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चीनने अपेक्षेपेक्षा कमी व्याजदर कपात केल्यामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये निराश होती, तरीही भारतीय शेअर बाजारांत आज तळाच्या भावाला खरेदी झाली. त्यामुळे सकाळी थोडा वेळ बाजारात घसरणीचे वातावरण होते. सेन्सेक्स ६४ हजार ८५३ अंशांपर्यंत घसरला होता; मात्र तळाच्या भावात खरेदी सुरू केल्यामुळे सेन्सेक्सने पुन्हा ६५ हजारांचा टप्पा सर केला.

सरकारी बँका, ऑईल अँड गॅस क्षेत्रांच्या निर्देशांकांमध्ये नकारात्मक वातावरण होते; तर आयटी, बांधकाम व्यवसाय, धातुनिर्मिती क्षेत्र आणि ऊर्जानिर्मिती क्षेत्राच्या कंपन्यांमध्ये खरेदी झाल्यामुळे ही क्षेत्रे एक ते दोन टक्क्यांनी तेजीत होती. आता लवकरच जाहीर होणाऱ्या देशी आणि परदेशी आर्थिक तपशिलावर तसेच अमेरिकी फेडरल बँकेचे अध्यक्ष पॉवेल यांच्या व्याजदरवाढीसंदर्भातील भाषणाकडे सर्वांचे लक्ष राहील. रिझर्व्‍ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा तपशीलही जाहीर होणार असल्याने त्याच्याकडेही सर्वांचे डोळे लागले आहेत, असे तज्ज्ञांनी दाखवून दिले.

मुंबई शेअर बाजारावरील बजाज फायनान्स पावणेतीन टक्के वाढला; तर इंडसइंड बँक आणि एअरटेल दोन टक्के वाढले. आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टीसीएस, ॲक्सिस बँक, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टाटा मोटर्स, नेस्ले, एल अँड टी हे शेअरही सुमारे एक टक्का वाढले.

कोट
जागतिक शेअर बाजारातील घसरण थंडावल्याने आज भारतातही खरेदी झाली; मात्र लवकरच बाजारात अनिश्चितताही येऊ शकते.
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com