हिवाळ्यात राज्यात ‘एच३एन२’ वाढणार

हिवाळ्यात राज्यात ‘एच३एन२’ वाढणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : येत्या हिवाळ्यात संपूर्ण राज्यात एन्फ्लूएन्झा एच३एन२ रुग्णांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. डॉक्टरांनी कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या चार महिन्यांत (जून ते सप्टेंबर) नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये २.८ पट वाढ झाली आहे, तर याच समान कालावधीत स्वाईन फ्ल्यू किंवा एच१एन१ मध्ये २० टक्के घट झाली आहे.
जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यभरात १९०६ एच३एन२ रुग्ण आढळून आले. त्यापैकी जून ते सप्टेंबर या कालावधीत १,३८८ प्रकरणे नोंदवली गेली, तर जानेवारी ते मेदरम्यान केवळ ५१८ प्रकरणे आढळून आली होती. याच कालावधीत एच१एन१चे ९६२ रुग्ण नोंदले गेले. त्यापैकी ४२५ प्रकरणे गेल्या चार महिन्यांत नोंदवले होती; तर जानेवारी ते मे या कालावधीत ५३७ रुग्ण नोंदले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंगी, एन्फ्लूएन्झा एच३एन, डोळ्यांच्या बुबुळाचा दाह, मलेरिया, इतर सर्व प्रकारचे आजार आणि विषाणूंमध्ये वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. एन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव जास्त वाढला असून चार महिन्यांत रुग्ण तिप्पट झाले. हिवाळ्यात ते आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.
...
विषाणूजन्य आजार
बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाची प्रकरणे अजूनही नोंदवली जात आहेत. आतापर्यंत केलेल्या सर्व एच३एन२ चाचण्यांपैकी ६० टक्के पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. हा एक विषाणूजन्य आजार आहे. बहुतेकदा या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. शिवाय हा विषाणूजन्य आजार किंवा तापासारखा आहे, जो वेगाने पसरतो. रुग्ण बरा होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवडे लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com