राज ठाकरेंच्या घरी बैठक ही घटनाबाह्य कृती

राज ठाकरेंच्या घरी बैठक ही घटनाबाह्य कृती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यातील टोलप्रश्नावर मनसेने आंदोलन करताच राज्य सरकार राज ठाकरे यांच्या घरी जाते, हे घटनाबाह्य असून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
सरकार राज ठाकरे यांच्या घरी जाते म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखे आहे. विरोधी पक्षाने मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो. तो कोणाच्या घरी मंत्री व अधिकारी पाठवून केला जात नाही, असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर टोलप्रश्नी बैठक घेतली होती. त्यानंतर मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांच्या घरी गेले. त्यांच्यासोबत सरकारी अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्यावरून काँग्रेसने ही टीका केली आहे.
...
टोलनाक्यांवर सरकारी कॅमेऱ्यांबरोबरच मनसेचे कॅमेरेही लावले जाणार आहेत, हे घटनाबाह्य आहे. सरकारच्या कॅमेऱ्यांबरोबर मनसेचे कॅमेरे कशासाठी?
- अतुल लोंढे, मुख्य प्रवक्ते, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com