बेस्टच्या आगारांत दुमजली पार्किंग

बेस्टच्या आगारांत दुमजली पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः बेस्टच्या ताफ्यात येत्या दोन वर्षांत साडेचार हजारांपेक्षा अधिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने आपल्या बस आगारात दुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याची चाचपणी बेस्टने सुरू केली आहे. सध्या गोवंडी, दिंडोशी आणि वांद्रे हे बेस्टचे तीन आगार निवडण्यात आले आहेत. आणखी काही आगारांचा यासाठी विचार केला जाणार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने दिली.
बेस्टचा ताफा २०२७ पर्यंत १० हजारापर्यंत जाईल. त्यामुळे भविष्यात बस गाड्यांना पार्किंगसाठी जागेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याचा विचार करून बेस्टने दुमजली बस पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमात सध्या २ हजार ९६८ बस असून आगामी दोन वर्षांत ४ हजार ५०० नवीन बस गाड्या येणार आहेत. तसेच २०२७ पर्यंत बसताफा १० हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट बेस्ट उपक्रमाने ठेवले आहे.
इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ही वर्ल्ड बँकेची सल्लागार असलेली कंपनी या सर्वाचा अभ्यास करणार आहे. या प्रकल्पात बेस्ट उपक्रम या प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच उपयोगिता तपासून पाहणार आहे. समितीच्या अहवालानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे बेस्टच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या बेस्टची २७ बस आगार असून त्यात ३ हजार ९४१ बस उभ्या करता येतात. तसेच इतर ठिकाणी ५११ बस गाड्या उभ्या करण्याची क्षमता आहे.
...
बेस्ट ताफा वाढणार
बेस्टकडे सध्या २,९६८ बस असून त्यातून ३१ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. बेस्टचा ताफा कमी झाला आहे. हा ताफा वाढवण्यासाठी बेस्टचा प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांत ४ हजार ५०० नवीन बस नव्याने दाखल होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com