४७३ तिकीट दलालांना मध्य रेल्वेकडून अटक

४७३ तिकीट दलालांना मध्य रेल्वेकडून अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये पुष्टीकरण केलेले (कन्फर्म) तिकीट मिळावे म्हणून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या तब्बल ४७३ दलालांना मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने कारवाई करत अटक केली आहे. या दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि अॅण्टी टाऊट स्क्वाड (एटीएस) पथकाने कंबर कसली होती. त्यानुसार पथकाने मध्य रेल्वेच्या सहा विभागांमधील संशयास्पद ठिकाणी छापे टाकत दलालांकडून सात लाख १० हजार रुपयांच्या दंड वसूल केला आहे. अनेक प्रवासी बोगस ओळखपत्राचा वापर करून रेल्वे तिकिटांचे आरक्षण करत होते. याशिवाय सॉफ्टवेअरचा वापर करून प्रवाशांकडून तिकिटासाठी अतिरिक्त पैसेही उकळत होते. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर तिकिटाच्या काळाबाजाराची ४०२ प्रकरणे नोंदवण्यात आली. या प्रकरणात ४७३ दलालांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यात मुंबई विभाग २८८, भुसावळ ७२, नागपूर ३४, पुणे ६८, सोलापूर ७ आदींचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com