रस्त्यांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

रस्त्यांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई महापालिका पर्यावरण संवर्धनासाठी ॲक्शन मोडवर आली आहे. रस्त्यांवर राडारोडा कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात पथक नियुक्त करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणचा राडारोडा रस्त्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विकसकाचे काम बंद करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबईत पाच ठिकाणी विविध बांधकामे सुरु असून बांधकामाच्या ठिकाणी हवा प्रदूषण होत असल्यास संबंधित विकसकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात पथक नियुक्त करण्याचे आदेश शुक्रवारी झालेल्या बैठकीत चहल यांनी संबंधित विभागाने दिले. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधित विकसकाला काम बंद करण्याची नोटीस बजावण्याचा निर्णय पालिकेने घेतली आहे. सोबतच प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली आणखी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत बांधकामांमुळे उडणारी धूळ आणि राडारोड्यामुळे प्रदूषणामध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारा राडारोडा रात्रीच्या वेळी मुंबईतील मोकळ्या जागा, रस्त्यांवर फेकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना आखल्या जात आहे. या संबंधित पालिका स्तरावर शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानुसार आगामी काळात रस्त्यावर राडारोडा टाकताना आढळल्यास संबंधितावर काम बंद करण्याच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com