अध्यक्ष सादर करणार वेळापत्रक?

अध्यक्ष सादर करणार वेळापत्रक?

अध्यक्ष सादर करणार वेळापत्रक?

अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १३ : सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीत व्यक्त केलेल्या, ताशेरे मानल्या जाणाऱ्या मतानंतर आमदार सुनावणीचे वेळापत्रक लवकरच पाठविले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालय हे आदरणीय असून तेथे देण्यात आलेल्या निर्णयांचा किंवा व्यक्त केलेल्या अपेक्षांचा आदर केला जाईल, मात्र कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केल्याचे समजते. त्यानंतर लगेचच विधान भवनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी बोलावून घेतल्याचे समजते. आमदारांना अपात्रतेच्या सुनावणीबद्दल वेळापत्रक देण्यात आले आहे. ते सरन्यायाधीशांच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. सॉलिसिटर जनरलच्या माध्यमातून येत्या सोमवारी (ता. १६) घटनापीठाच्या लक्षात ही बाब आणून दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com