Workers repairing fractures in railway tracks.
Workers repairing fractures in railway tracks. esakal

Mumbai Railway Track: रेल्वेचे रूळ झाले अधिक सक्षम, तडा जाण्याच्या घटनांत ५० टक्क्यांनी घट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : उपनगरीय रेल्वेची वाहतूक विस्कळित होण्याच्‍या अनेक कारणांपैकी एक म्हणजे रेल्वे रुळाला तडे जाणे. मात्र, मध्य रेल्वेने यावर मात केली आहे. नियमितपणे देखभाल दुरुस्ती आणि आता आधुनिक पद्धतीने रेल्वे रूळ फिश प्लेट जॉइंट्सचे ऑइलिंग आणि ग्रीसिंग काम सुरू केल्याने तडे जाण्याचे प्रमाण ५० टक्के कमी झाले असल्‍याचा दावा प्रशासनाने केला आहे.
रेल्वे रुळांना तडे जाण्याच्या घटना रोखण्यासह त्‍यांची सुरक्षा वाढविण्यासाठी मध्य रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

विशेष म्हणजे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रमाण सर्वाधिक हिवाळ्यात असते. वातावरणातील बदलाचा फटका रेल्वे रुळांना बसतो. त्यामुळे हिवाळ्यात रेल्वे रुळाला तडे जाऊन लोकल सेवा विस्कळित होऊ नये म्हणून सीएसएमटी ते कल्याण-कसारा-कर्जत-आसनगाव या मुख्य मार्गावरील सुमारे ९० टक्के ठिकाणी फिश प्लेट जॉइंट्सचे ऑइलिंग आणि ग्रीसिंग पूर्ण केले आहे; तर उर्वरित २,९८६ जॉइंट्सचे काम येत्या एक ते दोन आठवड्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्‍या हिवाळ्यात तडे जाण्याच्या प्रमाणात कमी असेल, असा दावा केला जात आहे.

घटनांची आकडेवारी
२०२१-२२ १०८
२०२२-२३ ५७

घटना अजून कमी होतील!
रेल्वेरुळाला तडे जाण्याच्या घटना प्रत्येक वर्षी कमी कमी होत जात आहे. गेल्या दोन वर्षांत रेल्वेरुळाला तडे जाण्याच्या घटनांत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. या घटना सिंगल डिजिटवर आणण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत असल्‍याचे प्रशासनाने सांगितले आहे.

९० टक्के काम पूर्ण
सीएसएमटी ते कल्याण-कसारा-कर्जत-आसनगाव या मुख्य मार्गावरील सुमारे ९० टक्के ठिकाणी फिश प्लेट जॉइंट्सचे ऑइलिंग आणि ग्रीसिंग पूर्ण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com