Dasara Shopping: पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडीची डोकेदुखी तरीही वाहन नोंदणीचा उच्चांक

Dasara Shopping: पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडीची डोकेदुखी तरीही वाहन नोंदणीचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम असली, तरी स्वत:च्या हक्काचे वाहन पाहिजेच, हा कल आता वाढू लागला आहे. त्यातच दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा ४,११८ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक २,६३८ दुचाकींचा समावेश आहे. मागील वर्षी ३,६१२ वाहनांची नोंद करण्यात आली होती.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या निमित्ताने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, वास्तू इत्यादींची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर नवनवीन वस्तूंनी ठाणे शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन, फ्रिज, स्मार्ट वॉच, टीव्हीच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.


सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाहन विक्रीवर शून्य डाऊनपेमेंट, सुलभ हप्ता अशा सवलती देण्यात येतात. याच संधीचा फायदा घेत ग्राहकांकडूनदेखील वाहन खरेदीला पसंती देण्यात येत असते. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहनमध्ये नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत ४,११८ नवीन वाहनांच्या नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये २,६३८ दुचाकी, ८६५ चारचाकी, ३२५ व्यावसायिक (गुड्स कॅरियर); तर ११६ रिक्षांचा समावेश आहे.


दर वर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनखरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. सुलभ हप्त्यासह कमी डाऊन पेमेंट आदी सुविधा सहज उपलब्ध असल्याने ग्राहकांनी दुचाकी वाहनाच्या बुकिंगला पसंती दिली आहे.
- चंद्रशेखर मोरे, वाहनविक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com