Activists of Sriram Chowk Mitra Mandal at Asoda Road carry the 21 feet idol of Goddess Durga while playing music.
Activists of Sriram Chowk Mitra Mandal at Asoda Road carry the 21 feet idol of Goddess Durga while playing music.esakal

Vijayadashmi: अबीर गुलालाची उधळण आणि गरब्याचा ठेका, खणाओटीने दुर्गामातेला भक्तांचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२४ : गेले नऊ दिवस भक्तीभावाने दुर्गामातेची पूजा केल्यानंतर अबीर, गुलालाची उधळण आणि गरब्याचा ठेका धरत मोठ्या जल्लोषात नवदुर्गेचे विसर्जन करण्यात आले. औक्षण, खणाचोळीने ओटी भरून महिलांनी दुर्गामातेला निरोप दिला. रायगड जिल्ह्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर ६२४ सार्वजनिक आणि १४४ खासगी देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

रायगड जिल्ह्यात विजयादशमी अर्थात दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या निमित्ताने गावागावांमध्ये दिवसभर मांगल्याचे वातावरण होते. याच दिवशी नवीन वस्तु खरेदीचा मुहूर्त अनेकजण साधत असतात. यामुळे बाजारपेठेत मोठी रेलचेल दिसून येत होती. याच दिवशी घर, कारखाने, कार्यालयातील वस्तुंची पूजा केली जाते. या निमित्ताने दुपारपर्यंत घराघरात भक्तीमय वातावरण होते.

त्यानंतर सायंकाळी सार्वजनिक मंडळाच्या दुर्गा मूर्तींच्या विसर्जनाची लगबग सुरु झाली. देवी दुर्गेने महिषासुराशी युद्ध केले आणि दशमीला त्याचा वध करून विजय मिळवला. नवरात्रीचा उत्सव देशभरात ९ दिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी देवीला थाटामाटात निरोप दिला जातो.

अखेर मंगळवारी (ता.२४) विजयादशमीला दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अलिबाग येथे सायंकाळी विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. महाड, माणगाव, मुरुड, श्रीवर्धन येथे विसर्जन मिरवणुकीत जल्लोष दिसून आला.

जिल्ह्यातील वातावरण भक्तीमय
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, देवी दुर्गेच्या मूर्तीचे थाटामाटात वाजतगाजत स्वागत झाले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील वातावरण भक्तीमय झाले होते. दररोज सायंकाळी देवीची आरती आणि त्यानंतर रंगणाऱ्या गरबा नृत्यामध्ये सर्वजण तल्लीन झाले होते. आज विजयादशमीला दसऱ्याला दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर देवीला निरोप देऊन वर्षभर आशीर्वाद कायम राहोत, अशा शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी शुभ मुहूर्तावर मातेचे विसर्जन करणे खूप शुभ मानले जाते. काही भाविक मातेला निरोप दिल्यानंतरच उपवास सोडतात.

पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा
घटस्थापनेमध्ये पेरलेले बियाणे दुर्गा विसर्जनाच्या दिवशी कुटुंबात वाटून द्यावे. त्याचवेळी, थोडेसे दागिने आपल्या तिजोरीत ठेवावेत, त्यामुळे पैशाची कमतरता भासत नाही. याच दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकाला देण्याची प्रथा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा सोहळा आनंदात साजरा केला गेला. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वी पोलिसांनी आपल्या शस्त्रांची पूजा केली.

रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुका
नवरात्रोत्सवात तरुणाईची गरबा खेळण्याची हौस संपतच नाही, ही हौस विसर्जन मिरवणुकीपर्यंत कायम असल्याने अनेक मंडळे विसर्जनाच्या मिरवणुका लांबवतात. डीजे आणि अबीर, गुलालाची उधळण करत गरबा खेळण्याचा आनंद लुटला जातो. यामुळे संध्याकाळी निघालेल्या मिरवणुका रात्री उशीरापर्यंत चालू होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com