शाहरूखच्या जन्मदिनी १७ मोबाईल गायब

शाहरूखच्या जन्मदिनी १७ मोबाईल गायब

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अभिनेता शाहरुख खान याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी जल्लोषाचा दिवस असतो. लाखोंच्या गळ्यांतील ताईत असलेल्या शाहरूखच्या ५८व्या वाढदिवसासाठी गुरुवारी (ता. २) वांद्रे परिसरातील बँड स्टँडपुढील शाहरूखच्या ‘मन्नत’ या निवासस्थानी शेकडो चाहते जमले होते. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १७ मोबाईल लांबवले.
शाहरुख खानचे निवासस्थान असलेल्या ‘मन्नत’पुढे शाहरूखची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते जमले होते. त्या वेळी अनेक मोबाईल चोरीला गेल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने याबाबत तक्रार दाखल केली. छायाचित्रकार त्याच्या मित्रासोबत त्या गर्दीच्या ठिकाणी आला होता. दुपारी १२.३० वाजता खिशात ठेवलेला मोबाईल गायब झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याच वेळी अनेक जणांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याचे त्याला कळले. वांद्रे पोलिस स्थानकात जाऊन त्याने चोरीची तक्रार दाखल केली. शाहरूखचे अनेक चाहत्यांनी मोबाईल चोरीची तक्रारी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
परळमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने याच स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत पोलिसांकडे १७ मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी शाहरूखच्या वाढदिवसाला त्यांच्या घरापुढे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतो. अशा वेळीही मोबाईल चोरट्यांनी मोबाईल लंपास करणे ही गंभीर प्रकार असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
...
वांद्रे पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीच्या विविध तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात गुन्हे नोंदवत तपास सुरू केला. कारवाई करत चीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून नऊ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
- संजय मराठे, वरिष्ठ उपनिरीक्षक, वांद्रे पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.