प्रदूषणप्रकरणी १०० हून अधिक बिल्डरांना नोटिसा

प्रदूषणप्रकरणी १०० हून अधिक बिल्डरांना नोटिसा

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबईतील हवा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत महापालिकेने १०० हून अधिक कंत्राटदार आणि रिअल इस्टेट कंपन्यांना हवा प्रदूषणप्रकरणी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांना धूळ कमी करण्याच्या नियमांचे पालन करण्यास सांगून कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मालाड भागात मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करीत असल्यालेल्या उपायोजनांची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. मालाड भागात ९७ खासगी बांधकामे सुरू असून २७ पालिकेची विकासकामे सुरू आहेत. यामध्ये रस्ते, नाले आणि पूल आदी प्रकल्पांचा समावेश आहे. दिघावकर म्हणाले, की आम्ही त्या सर्वांना धूळ कमी करणे आणि इतर प्रदूषणविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पत्रे पाठविली आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

बिल्डर्स आणि कंत्राटदारांनी स्प्रिंकलर आणि फॉगिंग मशीन मिळेपर्यंत वायू प्रदूषणाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे, याची खात्री करण्यासाठी पत्रेही पाठवली आहेत. त्यामुळेच मालाड विभागात कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती दिघावकर यांनी दिली.

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
पालिकेच्या रस्ते, नाले, पूल बांधणे आणि पाडणे, वाहनांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सर्व साईट्सवर सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, तसेच मुंबईत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमांचे पालन करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पालकमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनीही आर्थिक राजधानीत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांवर हवा शुद्धिकरण यंत्रे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बेस्टच्या ३५० बसमध्ये हवा शुद्धिकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.