निर्देशांकांची सलग दुसरी वाढ

निर्देशांकांची सलग दुसरी वाढ

मुंबई, ता. ३ : जागतिक आणि देशांतर्गत अनुकूल परिस्थितीमुळे आज भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशीही तेजी अनुभवली. सेन्सेक्स, निफ्टी साधारण अर्धा टक्के वाढले. आज सेन्सेक्स २८२.८८ अंश तर निफ्टी ९७.३५ अंश वाढला.

जागतिक शेअर बाजारामधील अनुकूल परिस्थिती आणि भारतीय कंपन्यांचे चांगले निकाल यामुळे आज सकाळपासूनच भारतीय शेअर बाजारात चांगले वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्सने आज दिवसभरात ६४ हजारांचा खालचा स्तर तोडला नाही. दिवसअखेर सेन्सेक्स ६४,३६३.७८ अंशावर तर निफ्टी १९,२३०.६० अंशावर स्थिरावला.

अनुकूल जागतिक घडामोडी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चांगला तपशील यामुळे भारतातील गुंतवणूकदार आशावादी झाले आहेत. भारतीय कंपन्यांच्या चांगल्या निकालामुळे आणि कच्च्या तेलाचे भाव थोडे कमी झाल्यामुळे त्यात भर पडल्याचे यावेळी तज्ञांनी सांगितले. त्यातच भारतीय ग्राहकांची मागणीही स्थिर असल्यामुळे दुसऱ्या सहामाहीत कंपन्यांचे उत्पन्न वाढेल, असाही अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

आज निफ्टीमधील अपोलो हॉस्पिटल, अदाणी पोर्ट, आयशर मोटर्स, एलटीआय माईंडट्री व टायटन या शेअरचे भाव वाढले. तर बजाज फिन्सर्व, डॉक्टर रेड्डीज लॅब, एसबीआय लाइफ, इंडसइंड बँक आणि टाटा स्टील या शेअरचे भाव कमी झाले.

..
आता अमेरिकी फेडरल बँक व्याज दरवाढ करणार नाही, या अपेक्षेने शेअर बाजार वाढत आहे. तर मोठ्या कंपन्यांच्या नफ्यात गेल्या वर्ष्यापेक्षा यंदा ४० टक्के वाढ झाल्याने आणि जागतिक चलनवाढ कमी झाल्यानेही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. 
- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्विसेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com