कांदिवलीत ई-बाईकच्या दुकानाला आग

कांदिवलीत ई-बाईकच्या दुकानाला आग

Published on

कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः एकतानगर म्हाडा वसाहतीमधील सर्व्हिस रोडवर असलेल्या एका इलेक्ट्रिक बाईकच्या दुकानाला अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविली. यात जीवितहानी झाली नाही. दुकानाला दुपारी ४.१० च्या दरम्यान ही भीषण आग लागली. एकमजली दुकानाच्या टेरेसवर इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी चार्जिंग करताना शॉर्टसर्किट झाले आणि अचानक आगीने पेट घेतला. दुकानावरील बॅनर जळून खाली पडल्याने आग पसरत गेली. यात इलेक्ट्रिक केबीन जळून खाक झाली. आगीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. संपूर्ण परिसराची वीज बंद केल्याने नागरिक हैराण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.