Vegan Food
Vegan Foodesakal

Vegan Food: व्हेगन फूड ते व्हेगन फॅशन! व्हेगन आहार नेमका आहे तरी काय?

गायत्री ठाकूर, डोंबिवली
सध्याच्या धावपळीच्या युगात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक जण ‘डाएट’वर (आहार) भर देत आहेत. अशात सध्या व्हेगन डाएटची क्रेझ वाढत आहे. या आहार पद्धतीत मांस-माशांसह अंडी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध किंवा कोणत्याही प्राण्यापासून मिळणारी उत्पादने आहारात पूर्णतः वर्ज्य केली जातात. यात सोया मिल्क हे दुधाला पर्याय म्हणून वापरले जाते. तसेच सोयाबिनपासून बनवलेला टोफू हा पनीरला; तर शेंगदाण्यांपासून बनवलेलं ‘पीनट बटर’चा लोण्याला पर्याय म्हणून आहारात समावेश केला जातो.

व्हेगन डाएटमध्ये दूध, अंडी, मांसाहार किंवा सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत, त्याला व्हेगन डाएट असे म्हणले जाते. अनेक जण याला शाखाहार म्हणजेच व्हेजिटेरियन डाएट असे म्हणतात; पण हा व्हेजिटेरियन डाएट पूर्नपणे वेगळा आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि दूध घेतले जाते; पण व्हेगन डाएटमध्ये याचा समावेश नसतो. यामध्ये फळ, भाज्या, व्होल ग्रेन्स, डाळ आणि सीडस् या गोष्टी प्रामुख्याने खाल्ल्या जातात.

व्हेगन आहार नेमका आहे तरी काय?
व्हेगन ही संकल्पना अलीकडच्या काळात परिचित आणि प्रसिद्ध होत असली, तरी त्याचे मूळ १९४४ मध्येच रुजले आहे. इंग्लंडमध्ये शाकाहारी लोकांची एक संस्था होती. त्यातीलच काहींनी डोनाल्ड वॉटसन यांच्या नेतृत्वाखाली व्हेगन सोसायटीची स्थापना केली. वॉटसन आणि त्यांची भावी पत्नी डोरोथी मॉर्गन यांनी व्हेगन हा शब्द तयार केला होता.

व्हेगन फूड ते व्हेगन फॅशन
सुरुवातीला केवळ आहारापासून सुरू झालेली ही चळवळ आता चक्क व्हेगन फॅशनपासून फूटवेअरपर्यंत पोहोचली आहे. ही उत्पादने तयार करताना प्राण्यांची कातडी, हाडे, लोकर किंवा रेशीम अशा कुठल्याच गोष्टीचा वापर केला जात नाही; तर व्हेगन शूज बनवताना कोणत्याही प्राण्याच्या चामड्याचा वापर केला जात नाही; तर ते पुनर्वापरयोग्य घटक एकत्र करून बनवले जातात. भांगेच्या झाडापासून बनवलेले कृत्रिम लेदर किंवा तागासह अन्य प्रकारच्या घटकांचा वापर करून हे फूटवेअर बनवले जातात.

व्हेगन डाएट कसा केला जातो?
व्हेगन डाएट अगदी नॉर्मल डाएटसारखेच असते. या डाएटला फॉलो केल्यानेसुद्धा तुम्हाला हे सगळे पोषणमूल्य मिळू शकतात. हा डाएट फॉलो करताना कोणत्या वेळी काय खायचे आहे ते आधीच ठरवलेले असते आणि त्याचे प्लॅननुसार तुम्हाला फूडस तुमच्या सोयीनुसार डाएटमध्ये समाविष्ट करायचे असते.

व्हेगन डाएटचे फायदे
१) व्हेगन डाएटमुळे वजन कमी होण्यास मदत होते. व्हेगन डाएट फॉलो करणाऱ्यांचा नॉन व्हेगन्सपेक्षा बॉडी मास इंडेक्स कमी असतो. हा या डाएटमध्ये जास्त फायबर खाल्ल्यामुळे पोट भरलेले असल्याचे जाणवत राहते आणि त्यामुळे तुम्ही आपोआपच कमी खाता. हेच वजन कमी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
२) व्हेगन डाएटमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते. व्हेगन डाएट फॉलो करणाऱ्यांना नॉन व्हेगन डाएट करणाऱ्यांच्या तुलनेत टाइप २ डाटबिटीस होण्याचा धोका कमी असतो.
३) व्हेगन डाएट फॉलो केल्यामुळे हृदय निरोगी राहते. व्हेगन डाएट फॉलो करण्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचा धोका कमी असतो.
४) हा डाएट फॉलो केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. व्हेगन डाएटमुळे खूप प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल आणि न्युट्रीएंट्स मिळतात.

या गोष्टींचीही काळजी घ्या
व्हेगन डाएट फॉलो करताना तुमच्या जिभेची चव बिघडू शकते. तसेच डाएट फॉलो केल्यामुळे ब्लड लेव्हल, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते. हा डाएट कायमस्वरूपी फॉलो करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच हा डाएट फॉलो करा असे आहारतज्ज्ञ अर्जुन काटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com