

विजेचा धक्का लागून मुलाचा मृत्यू
चेंबूर, ता. २८ (बातमीदार) ः चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीजवळ सुरू असलेल्या मेट्रो कामाच्या ठिकाणी लघुशंका करण्यास गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झालाची घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीसमोर वडाळा ते कासारवडवली मेट्रो रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी वीज वाहिन्या उघड्यावर टाकल्या असून खबरदारी म्हणून ठेकेदाराने लोखंडी पत्रे लावले आहेत. सोमवारी संध्याकाळी सिद्धार्थ कॉलनीतील भुयारी मार्गासमोर राहणारा प्रज्वल नकाथे हा मुलगा लघुशंका करण्यास या ठिकाणी गेला असता त्याला अचानक विजेचा धक्का लागला. तात्काळ स्थानिकांनी पोलिस व अग्निशमन दलास कळवल्यावर त्यांनी जखमी मुलाला सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचाराकरिता नेले; मात्र डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मुलाला मृत घोषित केले. याबाबत नेहरू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.
मेट्रो प्रशासनाच्या हलगर्जीपणाने माझ्या नातवाचा बळी गेला आहे. पोलिसांनी कारवाई करून मला न्याय द्यावा.
- वंदना नकाथे, आजी
माझा एकुलता एक मुलगा होता, आठवीत शिकत होता. शाळेतून आल्यावर बाहेर फिरून येतो असे सांगून गेला.
मेट्रोचे काम या ठिकाणी सुरू आहे. केबल उघड्यावर टाकून ठेवलेले आहेत. मुलाला अचानक विजेचा धक्का लागला. याला मेट्रो प्रशासन व ठेकेदार जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- अमृता नकाथे, आई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.