मनसेच्या आंदोलनाला यश; पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

मनसेच्या आंदोलनाला यश; पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : दुकानांवर मराठी पाट्या करण्यासंदर्भात न्यायालयाने मुदत देऊनही बाजारपेठांमध्ये अजूनही इंग्रजी पाट्या झळकत असल्यामुळे रविवारी (ता. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले असल्याचा दावा मनसेने केला आहे; मात्र या आंदोलनाबाबत पोलिसांनी कारवाई करीत पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली; तर दुसरीकडे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दुकानदारांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी रविवारी एका दुकानाच्या इंग्रजी पाट्यांवर काळ्या शाईने भरलेले फुगे फेकून निषेध व्यक्त केला. यावरून पोलिसांनी आंदोलनातील सहभागी मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, हिरा पासी, दिनकर फुलसुंदर, कृष्णा देवकोटा यांना अटक करून गुन्हे दाखल केले. प्रशासन आणि पोलिसांनी दुकानदारांवर अगोदरच कारवाई केली असती, तर मनसेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली नसती. ज्याप्रमाणे आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, त्याचप्रमाणे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी दुकानदारांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.

------------------
गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावरून लढत आहे. मनसेच्या वतीने मराठी पाट्यांसाठी विविध आंदोलनेदेखील करण्यात आली; मात्र प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. मराठी भाषेचा आदर करणे व मराठी अस्मिता व संस्कृतीचा आदर करणे हे खूप महत्त्वाचे असून महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या लोकांना मनसे आंदोलनाने धडा शिकवेल.
- स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग, मनसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com