

‘नृत्यकला निकेतन’च्या १५० व्या अरंगेत्रमची विक्रमी नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : दर्जेदार भरतनाट्यम नृत्यांगना घडवणाऱ्या ‘नृत्यकला निकेतन’च्या १५० व्या अरंगेत्रमचे सादरीकरण गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे झाले. या अरंगेत्रमची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. गुरू अर्चना पालेकरांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यकला निकेतन शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण संस्था ही मुंबईतील पहिली संस्था आहे.
भूमी वहाळकर, धृमी शाह, दिया शाह, ईशा सावंत, माही वाघेला, शैली चौहान आणि शेनश्री रापोझा या विद्यार्थिनींनी अरंगेत्रम सादर केले. या वेळी प्रेक्षकांमध्ये ‘नृत्यकला निकेतन’च्या संचालिका गुरू अर्चना पालेकर, संस्थेच्या गुरू मयूरी खरात, डॉ. मंजू लोढा, गुरू सुमित्रा राजगुरू संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी संजय नार्वेकर, सुषमा नार्वेकर यांची उपस्थिती होती. गुरू अर्चना पालेकर त्यांच्या भरतनाट्यम क्षेत्रातील ४१ वर्षांहून अधिक उल्लेखनीय योगदान तसेच भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल ‘मदर इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नृत्यकला निकेतनमध्ये अरंगेत्रमच्या परंपरेची सुरुवात माझ्यापासून झाली. त्यानंतर झालेल्या १४९ अरंगेत्रमची मी साक्षीदार आहे. या संस्थेतील माझ्या विद्यार्थिनी ते शिक्षिकेचा प्रवास प्रगल्भ करून गेला आहे. माझी आई गुरू अर्चना पालेकर हिने आतापर्यंत संस्था मोठी करण्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे, त्याचे फळ म्हणजे आम्ही केलेला हा आजचा विश्वविक्रम. एखाद्या शिक्षिकेसाठी यापेक्षा अजून समाधान ते काय? तरीही आम्हाला अजून मजल मारायची आहे.
- मयूरी खरात, गुरू, नृत्यकला निकेतन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.