

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः दुकानांवर मराठी पाट्यांबाबत आज पालिकेच्या पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली. मराठी पाट्या नसल्याने आज पहिल्याच दिवशी १७६ दुकाने आणि आस्थापनांवर पालिकेने कारवाई केली. मराठी पाट्या न लावल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने आजपासून पालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांनी ३ हजार २६९ दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. त्यांनी मराठी नामफलकांची तपासणी केली. या तपासणीत मराठी पाट्या तीन हजार ९३ दुकानांवर आढळल्या. दोषी दुकाने अथवा आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार प्रतिव्यक्ती रुपये दोन हजार याप्रमाणे आणि जास्तीत जास्त रुपये एक लाख या मर्यादेत दोषकर्त्याला दंड केला जाईल. सातत्याने नियमभंग केला आहे असे आढळले तर प्रतिदिन रुपये दोन हजारप्रमाणे दोषी दुकानदार व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
...
मद्यविक्रेत्या दुकानांना निर्देश
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान, आस्थापनाला लागू असलेल्या कलम सातनुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. यानुसार मद्यविक्रेत्या दुकानांनाही महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
...
अशी झाली कारवाई
विभाग- भेटी- पाट्या लावलेली दुकाने- कारवाया
ए + बी + सी विभाग : ३००/२९७/३
डी विभाग : ९८/८९/८
ई विभाग : १०१/९७/४
एफ-दक्षिण विभाग : १४७/१४२/५
एफ-उत्तर विभाग : ७१/६७/४
जी-दक्षिण विभाग : १९५/१८६/९
जी-उत्तर विभाग : १७८/१७४/४
एच-पूर्व विभाग : १२७/११७/१०
एच पश्चिम विभाग : १४२/१३०/१२
के पूर्व विभाग : १६५/१५४/११
के-पश्चिम विभाग : २७१/२६४/७
एल विभाग : १५१/१४८/३
एम-पूर्व विभाग : ८९/८१/८
एम-पश्चिम विभाग : १५५/१४९/६
एन विभाग : ८९/७१/१८
पी-दक्षिण विभाग : १८९/१८०/९
पी-उत्तर विभाग : १०३/९६/७
आर-दक्षिण विभाग : १३६/१२९/७
आर-उत्तर विभाग : २०७/२००/७
आर-मध्य विभाग : १५५/१४५/१०
एस विभाग : ९८/८४/१४
टी विभाग : १०३/९३/१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.